SRM College

Late Shri. Shantaram Potdukhe
Founder President Sarvodya Shikshan Mandal, Chandrapur

Founder President

शुभेच्छा....

समाजकार्य महाविद्यालयासंबंधी माझ्या मनात पूर्वीपासूनच कुतूहल होते.नागपूरच्या कमलाबाई होस्पेट मातृसेवा संघाच्या समाजकार्य महाविद्यालयाची प्रेरणा माझ्या मनात खोलवर रूजली होती व अशा प्रकारचे महाविद्यालय चंद्रपूरात व्हावे असे मला मनोमन वाटत होते.त्याकरीता सर्वाेदय शिक्षण मंडळाने प्रयत्न केला.याच प्रयत्नाचा भाग म्हणून तत्कालीन समाजकल्याण मंत्री व माझे जवळचे मित्र श्री.शिवाजीराव मोघे यांचे कडे आग्रह धरला.श्री शिवाजीराव मोघे मला म्हणाले की,‘‘महाराष्ट्र शासनाच्या अनुभव आहे की,समाजकार्य विभागातील मुले शिक्षणानंतर नोकÚया मागतात त्यामुळे समाजकार्य विभागातील मुले शिक्षणानंतर नोकÚया मागतात त्यामुळे समाजकार्य महाविद्यालय झाल्यास विद्याथ्र्यात जाणिव निर्माण होउन समाजकार्याकडे त्यांचा ओढा वाढेल.‘महाराष्ट्र शासनाचे धोरण बदलून हे महाविद्यालय द्यावे’असा आग्रह करून तत्कालीन मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांचेकडून हे महाविद्यालय चंप्रपूरला मंजूर करून घेतले.

या महाविद्यालयाच्या स्थापनेत अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.अनुदानीत तत्वावर हे महाविद्यालय मिळण्याच्या कार्यवाहीला शासनातर्फे बराच विलंब लागला.महाराष्ट्राचे सरदार बदलले व भाजप-शिवसेना युती सरकारने मुख्यमंत्री श्री मनोहरराव जोशी यांचेकडे आग्रह धरला व अनुदान मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या.अशा अवस्थेत महाविद्यालयाची वाटचाल बिकट झाली.याच दरम्यान या स्वतंत्र महाविद्यालयाची फॅकल्टी केव्हा झाली हे लक्षातच आहे नाही.विद्यापीठाच्या शिफारसी नंतर वेगळे महाविद्यालय देण्यात शासन तयार नव्हते त्यामुळे हया फॅकल्टीचे स्वतंत्र महाविद्यालयात रूपांतर करण्यास सर्वोदय शिक्षण मंडळाला निकराचा प्रयत्न करावा लागला.

या महाविद्यालयाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील आणि विशेषतः चंद्रपूरच्या झोपडपट्टीतील प्रश्न सोडविण्याकरीता मदत होईल असा विश्वास वाटतो.चंद्रपूर शहरात एकूण 40 झोपडपट्टया असून 1/3 लोकसंख्या या झोपडपट्टयात राहते.या महाविद्यालयाच्या माध्यमातून इथे आलेल्या बाल मजूरांचे प्रश्न,सामाजिक व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या तरूण मुलामुलींचे प्रश्न,आर्थिक विषमतेमुळे पेटलेल्या समासव्यवस्थेचे प्रश्न इ.बाबतीत हे महाविद्यालय योग्य भूमिका बजावेल हा विश्वास मला व्यक्त करावासा वाटतो.

या महाविद्यालयाचे‘इंस्टीटयूशन’मध्ये परिवर्तन करण्याचा व्यवस्थापन मंडळाचा विचार आहे.वेगळे महाविद्यालय झाल्यानंतर सरदार पटेल महाविद्यालयाप्रमाणेच संस्थेचे फ्लॅगशिप म्हणून आपला लैकिक वाढवेल हा विश्वास मला व्यक्त करावासा वाटतो.या महाविद्यालयाचे नवीन प्राचार्य,त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी,सर्वाेदय शिक्षण मंडळयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात नवीन इमारत आणि वसतीगृहासह आपला लौकिक वाढवतील.वसतीगृहासह नविन इमारत आणि वसतीगृहासह आपला लौकिक वाढवतील. वसतीगृहासह नवीन इमारत उपलब्ध करून देण्यात श्री मामीडवार बंधंूनी दिलेली देणगी व वस्तीगृहाकरीता चंद्रपूरचे सांसद सदस्य श्री.हंसराज अहीर यांनी दिलेले मोलाचे योगदान महत्वाचे आहे.

नवीन कॅम्पसमध्ये या महाविद्यालयाचे विद्यार्थी, अध्यापक व प्राचार्य यांना मी भविष्याच्या शुभकामना देतो.

शांताराम पोटदुखे
अध्यक्ष
सर्वाेदय शिक्षण मंडळ, नागपूर